Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होण्यासाठी एक दिवस बाकी आहे. उद्या, २८ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कालचा भाग रोहित शेट्टीच्या धारदार प्रश्नांनी चांगलाच रंगला. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप-५ सदस्यांना रोहित शेट्टीने त्याच्या प्रश्नातून आरसा दाखवला. त्यामुळे सध्या रोहितचं कौतुक होतं आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये रोहितने विक्की जैन शो बाहेर येऊन करत असलेल्या पार्टीसंदर्भात माहिती अंकिताला देताना दिसत आहे.

हेही वाचा – सरकार दरबारी ‘या’ मराठी अभिनेत्याचं झालं कौतुक, पोस्ट करत म्हणाला, “अविस्मरणीय दिवस…”

रोहित शेट्टी शो बाहेर माहिती देण्यापूर्वी ‘बिग बॉस’ची परवानगी मागतो. तेव्हा ‘बिग बॉस’ त्याला परवानगी देतात. जाता जाता रोहित अंकिताला सांगतो की, विक्कीने आतापर्यंत दोन पार्टी केल्या आहेत. एका पार्टीमध्ये सना खान, आयशा खान, इशा मालविया आणि आणखी एक कोणी तरी मुलगी आहे, जी माहित नाही. इन्स्टाग्रामवर फोटो आला आहे. मी माझ्या कामाची शप्पथ घेतो. मी अजिबात खोटं सांगत नाही. आतापर्यंत त्याने दोन पार्टी केल्या आहेत आणि आजही सुरू आहे. घरीच पार्टी करत आहे. तुझ्या घराला पांढऱ्या, क्रिमश रंगाचं फ्लोअरिंग आहे, बरोबर? आता तिसरी पार्टी सुरू आहे. त्याचाही फोटो व्हायरल होतं आहे.

रोहित शेट्टीचं हे बोलणं ऐकून अंकिताला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते, “आता जोराची कानशिलात देणार आहे.” कारण अंकिताने विक्कीला शो बाहेर जातानाच बजावलं होतं की, पार्टी वगैरे करू नकोस. तरीही विक्की शो बाहेर आल्यापासून पार्टी करताना दिसत आहे.

हेही वाचा – Shehnaaz Gill Birthday: अभिनयासाठी घर सोडलं, पंजाब ते बॉलीवूडपर्यंत ‘असा’ होता शहनाझ गिलचा प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप-५ सदस्यांना भरभरून मत दिली जात आहेत. अनेक कलाकार मंडळी आपल्या आवडत्या सदस्यांना मत देण्यासाठी चाहत्यांना आवाहन करताना दिसत आहेत. अशातच आता अंकिताला पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री अमृता खानविलकर गेली आहे.