Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे आठ आठवडे झाले आहेत. सध्या नववा आठवडा सुरू आहे. या नव्या आठवड्याचा ‘टाइम गॉड’ रजत दलाल झाला आहे. नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला. यावेळी ‘टाइम गॉड’ होण्याची संधी नशीबावर अवलंबून होती. करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, चाहत पांडे यांना ‘टाइम गॉड’ होण्यासाठी संधी मिळाली होती. पण चौघांचीही संधी हुकली. त्यानंतर रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठीमध्ये ‘टाइम गॉड’ होण्याचा टास्क पार पडला. यामध्ये करणवीर मेहराच्या एका चुकीमुळे रजत दलाल ‘टाइम गॉड’ झाला.

आता ‘बिग बॉस’च्या घरात लवकरच काही पाहुणे येणार आहेत. हे पाहुणे घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच त्यांच्या टोकदार प्रश्नांची उत्तरं घरातील सदस्यांना द्यावी लागणार आहेत. याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिल्पा शिरोडकरच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

शिल्पाच्या प्रोमोमध्ये लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप संवाद साधताना दिसत आहे. यावेळी शिल्पा धाकटी बहीण नम्रता शिरोकडरच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी नम्रता शिरोडकरबरोबर भांडण झाल्याचं शिल्पाने सांगितलं आहे.

शिल्पा अनुराग कश्यपला सांगत म्हणाली, “माझं आणि तिचं एक भांडण झालं होतं. मी जेव्हा शोमध्ये येत होती तेव्हा मी दोन आठवडे तिच्याशी बोलले नव्हते. मला तिची खरंच खूप आठवण येत आहे. ती मला भेटण्यासाठी यावी, असं मला खूप वाटतं आहे.”

हेही वाचा – श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं

पुढे अनुराग कश्यप म्हणतो, “तू सावधपणे खेळतेय असं लोक म्हणत आहेत.” यावर शिल्पा म्हणते, “माझे कुटुंबातील लोकं नाहीयेत, जे मला पकडून सांगितली. मी माझ्या कुटुंबातील सर्वात लहान व्यक्ती आहे.”

हेही वाचा – स्वप्नील जोशी आता डॅशिंग अंदाजात झळकणार, म्हणाला, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिल्पा शिरोडकरची सख्खी बहिणी नम्रता शिरोडकर ही देखील अभिनेत्री आहे. १९९३ साली फेमिना मिस इंडियाचा खिताब तिने जिंकला होता. नम्रता ही दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे. त्यामुळे शिल्पा महेश बाबूची मेव्हूणी आहे.