Bigg Boss 19 Elimination Update : ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या पर्वात छोट्या पडद्यावरील काही कलाकारांसह सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि गायक सहभागी झाले आहेत. शो सुरू होऊन आता जवळपास ७५ दिवस पूर्ण झाले आहेत.
‘बिग बॉस १९’चे हे पर्व आता अंतिम भागाकडे वाटचाल करीत आहे. हा शो चार आठवड्यांनी वाढवला जाणार, अशी चर्चा सुरू होती; पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन ठरलेल्या वेळेतच संपणार आहे. म्हणजेच शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
ग्रँड फिनालेच्या वृत्ताबरोबरच आता अशीही अपडेट समोर येत आहे की, फिनालेपर्यंत पोहोचेन, असा दावा करणारा अभिषेक बजाज आता या शोमधून बाहेर पडणार आहे. त्याच्यासह नीलम गिरी हिचाही ‘बिग बॉस’मधील प्रवास संपणार आहे.
‘इंडिया टुडे’च्या अहवालानुसार, शोच्या निर्मात्यांनी सुरुवातीच्या वेळापत्रकावरच ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रॉडक्शनशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “सीझन वाढवण्याचा काहीच विचार नाही”. म्हणजेच शो एकूण १५ आठवडे चालेल आणि त्यात कोणताही बदल होणार नाही.
तसेच अभिषेक आणि नीलमच्या एलिमिनेशनबाबतची माहितीची पोस्ट ‘BBTak’ या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. पोस्टनुसार, या आठवड्यात डबल एविक्शन झाले आहे, ज्यात नीलम गिरी आणि अभिषेक बजाज हे दोघे घराबाहेर गेले आहेत.
‘बिग बॉस १९’मधील डबल एविक्शनची पोस्ट
? BREAKING! SHOCKING DOUBLE EVICTION!
— BBTak (@BiggBoss_Tak) November 7, 2025
Abhishek Bajaj and Neelam Giri are EVICTED from #BiggBoss19 house
अर्थात, ही बातमी कितपत खरी आहे, हे शनिवार-रविवारच्या ‘वीकेंड का वार’ या भागात समजणार आहे. तसंच BBTak च्या माहितीनुसार, शोचा होस्ट सलमान खाननं या आठवड्यात गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांना सुरक्षित स्पर्धक घोषित केले आहे. त्याचबरोबर प्रणितला एक विशेष अधिकार देण्यात आला आणि तो म्हणजे तिघांपैकी एकाला नॉमिनेशनपासून वाचवण्याचा.
नॉमिनेशनमध्ये असलेल्या उर्वरित अशनूर, अभिषेक व नीलम या तिघांपैकी प्रणितनं अशनूरला वाचवलं आणि त्यामुळे नीलम व अभिषेक शोमधून बाहेर पडले. दरम्यान, आजारी पडल्यामुळे प्रणित काही काळासाठी घराबाहेर गेला होता; पण शुक्रवारच्या भागात त्याची घरात पुन्हा एन्ट्री झाली. तो येताच घरातले सगळे सदस्य खुश झाले आहेत.
