‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळे अभिनेता विशाल निकम घराघरांत लोकप्रिय झाला. सर्वांचा आदर करण्याची भावना आणि खिळाडूवृत्तीमुळे विशालने बिग बॉसच्या घरात सर्वांना आपलंस करून घेतलं. दमदार खेळाच्या जोरावर त्याने तिसऱ्या पर्वाच्या विजेत्यापदावर आपलं नाव कोरलं होतं. याशिवाय त्याने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई- मायेचं कवच’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या विशाल एका ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं शूटिंग मध्यंतरी पन्हाळगडावर सुरू होतं. याच निमित्ताने अभिनेता जवळच असलेल्या ज्योतिबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

हेही वाचा : सायलीच्या खोट्या गरोदरपणाचा कट कोणी रचला? ‘ठरलं तर मग’च्या नव्या भागात सत्य येणार समोर

विशाल निकमची कोल्हापूरात मातीशी नाळ जोडलेला अभिनेता अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ज्योतिबाच्या मंदिरात विशाल आलेला पाहताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली. हा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विशाल लिहितो, “जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में जीत जाऊं…देवाच्या कृपेने मला जे हवंय ते मला मिळालं आहे…असंच प्रेम आणि तुमची साथ कायम माझ्यासोबत राहूद्या.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत जबरदस्त एंट्री; महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

मंदिर परिसरात विशालबरोबर फोटो काढण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत एका काकांनी अभिनेत्याकडे सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. पण, त्या काकांकडे मोठा सेल्फी कॅमेरा असलेला फोन नव्हता. त्यांनी त्यांच्याजवळ असलेला जुना, लहान बटणाचा फोन विशालच्या हातात दिला. अभिनेत्याने फोन पाहिल्यावर जराही विचार न करता थेट त्या बटणाच्या फोनमध्ये मागच्या कॅमेऱ्याने काकांबरोबर सेल्फी काढला. अभिनेत्याची ही कृती पाहून काकांबरोबर उपस्थित असलेले विशालचे सगळेच चाहते भारावून गेले.

हेही वाचा : “आता झिम्माच्या बायका परत…”, सिद्धार्थ चांदेकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, सायली संजीव रागात म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशालचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “गरिबीची जाण असलेला विशाल निकम”, “हे कोल्हापूर आहे इथं पैशापेक्षा माणसांना खूप महत्व दिल जात”, “माणसातला देव माणूस आमचा विशाल दादा…”, “विशाल म्हणजे राजा माणूस”, अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी त्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला एका दिवसांत ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.