‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे काहीच आठवडे शिल्लक आहेत. या आठवड्यात दोन सदस्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार आहे. शनिवारी (१७ नोव्हेंबर) महेश मांजरेकरांनी घेतलेल्या चावडीत सदस्यांसह प्रेक्षकांनाही डबल एलिमिनेशनचा धक्का दिला.

‘बिग बॉस’मधील डबल एलिमिनेशन प्रक्रियेतून एका सदस्याने शनिवारी घरातून एग्झिट घेतली. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतचा ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वातील प्रवास शनिवारी संपला. विकासने घराबाहेर पडत सदस्यांचा निरोप घेतला. घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी विकास एक होता. टास्कदरम्यानही विकासची आक्रमता घरातील सदस्य व प्रेक्षकांना त्याची दखल घेण्यास भाग पाडायची.

हेही वाचा>>शाहरुख खानच्या मुलांनाही पाहायचा नाही ‘पठाण’, ‘या’ चित्रपटासाठी उत्सुक; अभिनेत्यानेच केला खुलासा

सुरुवातीपासूनच विकासची किरण मानेंबरोबर घट्ट मैत्री झाली होती. किरण माने व विकासच्या मैत्रीत अधूनमधून खटके उडायचे. परंतु, घरात त्यांचा कायमच एकत्रित वावर असायचा. त्यामुळेच विकास घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विकासला घट्ट मिठी मारुन ते रडतानाही दिसले.

हेही वाचा>> “…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

विकास सावंतने ‘बिग बॉस’च्या घरातून निरोप घेतल्यानंतर किरण मानेंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भावूक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये किरण माने व विकासचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. “ईक्या लेका लय आठवण येईल तुझी”, असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>>मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी पार पडला शाही विवाहसोहळा, मेहंदीचे फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास सावंत घरातून बाहेर पडल्यानंतर आज आणखी एका सदस्याचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपणार आहे. आता घरात टिकून राहण्यासाठी सदस्यांना आणखी मेहनत व खेळात डावपेच करावे लागणार आहेत.