‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे एकमेकांबरोबर सूर जुळले. प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांच्यातही घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातील ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती.

अमृता व प्रसादसाठी त्यांच्या चाहत्यांनी ‘प्रमृता’ हा हॅशटॅगही बनवला होता. ‘बिग बॉस’च्या घरातून ते दोघेही बाहेर पडल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेण्डही झाला होता. प्रसाद व अमृताने त्यांच्या या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्यात अमृता व प्रसादने खास रोमॅंटिक डान्स केलेला पाहायला मिळाला.

हेही पाहा>> Photos: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं चाहत्यांना ‘याड लागलं’; नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला

प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अमृताबरोबरच्या या रोमॅंटिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “तर अशी काहीशी होती आमची prom date…इथे हृदयात वसंत ही फुलाला आणि सदाबहार मराठी गाण्यांवर थिरकलोही. खरंतर हा परफॉर्मन्स खास #Pramruta फॅन्स साठी dedicated आहे!”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> …म्हणून राज ठाकरेंच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच केलं बूक

प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “ताज डेटवर कधी जाणार”, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर “तुम्ही एकमेकांबरोबर खूप छान दिसता”, अशा आशयाच्या कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “ट्रॉफीवर नाव कोरल्यावर गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती?”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसादने अमृताबरोबरच्या नात्याबाबत वक्तव्य केलं होतं. आमचं नात मैत्रीपलिकडे असल्याचं तो म्हणाला होता. प्रसादने बाहेर पडल्यानंतर अमृताला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली होती.