Bigg Boss Marathi Shiv Thakare : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवड्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. निक्की तांबोळीने यंदा ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत थेट ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मिळवली आहे. तर, घरातील अन्य सहा सदस्य मिडवीक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात खास पाहुणा येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) दुसऱ्या पर्वात विजेता आणि हिंदी पर्वाचा उपविजेता ठरलेला शिव ठाकरे आजच्या भागात घरात एन्ट्री घेणार आहे. शिवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा मनमोकळा स्वभाव, सर्वांना आपलंसं करून घेण्याची वृत्ती, बळ व बुद्धी दोन्ही गोष्टींचा वापर करून टास्क खेळणं यामुळे हिंदी व मराठी या दोन्ही सीझनमध्ये शिवने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. असा हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आज पाचव्या सीझनमध्ये सगळ्या सदस्यांना भेटायला घरात एन्ट्री घेणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist! अरबाज पटेलच्या कमेंटने वेधलं लक्ष, तर नेटकरी म्हणाले, “हिला फुकटात…”

Bigg Boss च्या घरात शिव ठाकरेची एन्ट्री

शिव ठाकरेने डॅशिंग अंदाजात घरात एन्ट्री घेतली आहे. घरात पहिलं पाऊल ठेवताच त्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळ संपूर्ण घराला वाकून नमस्कार केला. यानंतर शिव ठाकरे येणार असल्याने घरात ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन रंगणार अशी घोषणा करण्यात आली. पुढे अभिनेता म्हणाला, “तुम्हा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा आणि सॅल्यूट” उपस्थित सदस्यांना व बिग बॉसच्या घराला मानाचा मुजरा करत शिवने सर्वांची भेट घेतली.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : शिव ठाकरे

आता शिव ठाकरेच्या ( Bigg Boss Marathi ) येण्याने घरात नवीन काय ट्विस्ट येणार? याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याशिवाय अनेकांनी कमेंट्समध्ये शिवला पाहून आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात आली बाबागाडी…; ‘तिकीट टू फिनाले’साठी रंगणार अनोखा टास्क, ७ सदस्यांमध्ये कोण मारणार बाजी?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातून मिडवीक एलिमिनेशनसाठी जान्हवी, वर्षा, अभिजीत, अंकिता, सूरज आणि धनंजय या सहा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. तर, निक्की ग्रँड फिनालेला एन्ट्री मिळाल्याने सेफ झाली आहे. आता उर्वरित सहा जणांमध्ये कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.