‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. दीपिका आणि तिचा पती शोएब कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांमध्ये असतात. दीपिकाचं शोएबबरोबर दुसरं लग्न आहे. दीपिकाचं पहिलं लग्न एका पायलटशी झालं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर दीपिकाने मालिकेतील तिचा सहकलाकार राहिलेल्या शोएबशी आंतरधर्मीय विवाह केला.

“एक दिग्दर्शक माझ्यासमोर कपडे काढून…” अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली “१४ वर्षांच्या…”

दीपिका कक्करने २०११ मध्ये पायलट रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं, त्याच वर्षी अभिनेत्रीचा हिट शो ‘ससुराल सिमर का’ देखील सुरू झाला होता. त्यांचे लग्न केवळ ४ वर्षे टिकू शकले व २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण आजही कोणालाच माहीत नाही. दीपिकाने कम्पॅटिबिलीटी इश्यूमुळे रौनकशी घटस्फोट घेतल्याचे बोलले जाते. तसेच तिचे पहिले लग्न तुटण्याचे कारण तिचा सहकलाकार शोएब इब्राहिम होता, असंही अनेकांचं मत आहे.

Video: MC Stan वर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप अनावर

मालिकेमध्ये दीपिकाच्या ऑन-स्क्रीन पती प्रेमची भूमिका शोएब इब्राहिमने धीरज धूपरला रिप्लेस करून साकारली होती. दीपिका आणि शोएबमध्ये सेटवर जवळीक वाढू लागली, त्यामुळे त्यांच्या पहिल्या लग्नावर परिणाम झाला, असं म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्रीने नेहमीच ही गोष्ट नाकारली आहे. तिच्या पहिल्या लग्नाचा अनुभव खूपच वाईट होता, असं ती अनेकदा सांगते. काही काळापूर्वी, दीपिकाने एका व्लॉगमध्ये सांगितले होते की, यापूर्वी तिला काय वेदना सहन कराव्या लागल्या आहेत हे लोकांना माहीत नाही. पण तिचं पहिलं लग्न तुटण्यामागचं कारण तिलाच माहीत असावं, कारण तिने आतापर्यंत त्याबाबत थेट बोलणं टाळलंय.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिकाने २०१८ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर शोएब इब्राहिमशी लग्न केले. तिने आपले नाव बदलून फैजा ठेवले. लवकरच दीपिका तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. ती आणि शोएब एकत्र खूप खूश दिसतात. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व्लॉगमधून चाहत्यांना अपडेट्स देत असते.