‘ऑपरेशन मेफेअर’मधून एक नवीन अभिनेत्री चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर या अभिनेत्री ही संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीचं नाव रितीका छिब्बर आहे. तिने १४ वर्षांपूर्वी मॉडेलिंग आणि अभिनय करण्यासाठी मुंबई गाठली होती. अनेक स्वप्ने घेऊन मध्य प्रदेशातील जबलपूर येथून मायानगरीत आलेल्या रितीकाला प्रचंड संघर्ष करावा लागला. यावेळी तिने या दीड दशकाच्या कालावधीतील अनुभवांबाबत भाष्य केलंय.

Video: MC Stan वर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप अनावर

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘रितीका छिब्बर म्हणाली, “या काळात मी हजारो ऑडिशन्स दिल्या असतील. मी अनेक रिजेक्शन्सना सामोरे गेले. जर तुम्ही इंडस्ट्री बाहेरचे असाल तर तुम्हाला या क्षेत्रात प्रवेश कसा घ्यावा, हे माहीत नसतं. अनेक विचित्र गोष्टींचा अनुभव येतो, काही गोष्टी आठवूनही मला अंगावर शहारे येतात. ऑडिशन दरम्यान निवड झाल्यावर कॉम्प्रोमाईज करण्याचे प्रस्ताव मला आले. इतकंच नाही तर मला आठवतं मी २१ वर्षांचे असताना एक दिग्दर्शक कपडे काढून माझ्यासमोर उभा राहिला होता. त्या घटनेमुळे मला मोठा धक्का बसला होता.” यासंदर्भात आज तक’ने वृत्त दिलंय.

“चांगल्या कुटुंबातून आलेल्या मुलीला हे सगळं बाहेरच्या जगाच्या रूपात पाहायला मिळालं तर तिची मन:स्थिती कशी असेल तुम्हीच विचार करा. त्या घटनेनंतर मी इतकी दुखावले होते की मी माझे करिअर बदलण्याचा विचारही केला. एक वर्ष मी कुठेही ऑडिशनसाठी गेले नाही. तेव्हा मी लहान होते, पण हळूहळू या अनुभवांनी मी खूप मजबूत होत गेले. माझ्या मेहनतीच्या जोरावर मला काम मिळालं तरंच करेन, कधीच तडजोड करणार नाही, असा माझा निर्धार होता. आज इतक्या उशीरा का होईना, पण देवाने माझं नक्की ऐकलं,” असं रितीका छिब्बर म्हणाली.

रितीका इंडस्ट्रीत काम करण्यासाठी लहान असतानाच मुंबईत आली. तिने तिचं शिक्षणही मुंबईतून पूर्ण केलं. ती कथ्थकमध्ये प्रशिक्षित नृत्यांगना आहे. लवकरच ती ‘ऑपरेशन मेफेअर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.