छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. अनेक हास्यवीरांना या शोमधून प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील स्किटचे डायलॉगही चाहत्यांच्या तोंडी असतात. यावर अनेक व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. हास्यवीर समीर चौगुले स्किटमध्ये मिमिक्री करुन वेगवेगळे आवाज काढत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या या मिमिक्रीने स्किटला चार चांद लागतात. समीर चौगुलेंचा असाच एक मिमिक्री आवाजाचा व्हिडीओ एका चाहत्याने एडिट केला आहे.

हेही वाचा>>“माझ्या तोंडातून बासुंदीचा सुगंध येतो”, राखी सावंतने सांगितला अभिजीत बिचुकलेचा ‘तो’ किस्सा

समीर चौगुलेंच्या आवाजावरुन बादशहाने त्याच्या गाण्याला म्युझिक दिल्याचं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरलाही हा व्हिडीओ आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

हेही वाचा >> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हास्यजत्रेतील कोहली फॅमिलीचा व्हिडीओही चाहत्याने एडिट केला होता. कोहली फॅमिलीवर चाहत्याने बनवलेला रील व्हिडीओही समीर चौगुलेंनी शेअर केला होता.