‘तुला पाहते रे’ या मालिकेत अभिनेते सुबोध भावेंबरोबर स्क्रीन शेअर करत अभिनेत्री गायत्री दातार(Gayatri Datar) घराघरांत पोहोचली. त्यानंतर ती बिग बॉस मराठीच्या ३ ऱ्या सीझनमध्येदेखील दिसली. अबीर गुलाल या मालिकेत गायत्रीने खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री चर्चेत असण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री लवकरच झी मराठी वाहिनीवरील चल भावा सिटी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. आता झी मराठी वाहिनीने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहे. याबरोबरच, तिला सगळ्यात जास्त राग कोणत्या गोष्टीचा येतो, याबद्दलही तिने वक्तव्य केले आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर गायत्री दातारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. घरी एकटं राहायची वेळ आली तर काय करतेस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिने म्हटले, “खरंतर मी घरी एकटी राहते. घरातील सगळे लाइट सुरू ठेवते. टीव्ही सुरू ठेवते आणि हॉलमध्ये झोपते.” पुढे तिला विचारण्यात आले की कोणती गोष्ट वेळेत मिळाली नाही तर तुला खूप राग येतो? वेळेत जेवायला मिळालं नाही तर मला खूप राग येतो. नात्यात तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? प्रेम की आदर? यावर बोलताना गायत्रीने आदर असे उत्तर दिले. तू मूडी आहेस का फूडी? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तिने म्हटले की जास्त फूडी आहे. तू कशाबाबतीत जास्त निवडक आहेस? मेकअप की माणसं? त्यावर बोलताना गायत्रीने माणसं असे उत्तर दिले आहे.

चल भावा सिटीमध्ये आता गायत्री काय धुमाकूळ घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गायत्री दातार तिच्या स्पष्टवक्तपणेमुळे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये चर्चेत आली होती. आता या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री नेमकं काय करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गायत्री दातारबरोबर अनेक सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या इन्फ्लुएन्सर सहभागी झाल्या आहेत. तसेच गाव खेड्यात काबाड कष्ट करणारी, वेगवेगळ्या पद्धतीचा काम -धंदा कऱणारी मुलेदेखील या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे. १५ मार्च पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.