‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच ते विवाहबंधनात अडकले. तर आता ते त्यांनी एकत्र गणेशोत्सव साजरा करत आहेत. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हार्दिकने अक्षयाल मोदक करता येतात की नाही हेही सांगितलं आहे.

आणखी वाचा : जेजूरीला जाताना अक्षया देवधरने जपली परंपरा, नेसली आईची २५ वर्षं जुनी साडी, पाहा खास झलक

हार्दिकच्या घरी गौरी गणपती असतात. अक्षया आणि हार्दिकचा लग्नानंतरचा हा दुसरा गणेशोत्सव आहे. तो ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर अगदी थाटामाटात साजरा करत आहेत. त्याचे काही फोटोही हार्दिक-अक्षयाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तर आता हार्दिक अक्षयाच्या पाककृतीबद्दल भाष्य केला आहे.

हेही वाचा : Video: राणादाच्या मांडीवर बसून पाठक बाईंनी दिल्या पोज, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “अक्षयला उत्तम स्वयंपाक करता येतो. तिला असं खूप वाटत असतं की मी तिने बनवलेलं जेवण जेवावं. पण डाएटवर असल्यामुळे मला अनेकदा तिच्या हातचं जेवता येत नाही. त्यावरून मला वर्षभर तिचं ऐकूनही घ्यावं लागतं. पण ती खूप मन लावून स्वयंपाक करते. असं काहीही नाही जे तिला करता येत नाही. एखादा पदार्थ जर येत नसेल तर तो ती शिकून लगेच बनवतेही. मोदकही ती उत्तम करते. तिला ते आधीपासूनच करता येतात.” तर आता अक्षया आणि हार्दिकच्या या बॉण्डिंगचं त्यांचे चाहते कौतुक करत आहेत.