‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिताने अंतरा, तर सौरभने मल्हार ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे या लाडक्या जोडप्याला आजही घरोघरी अंतरा-मल्हार म्हणून या मालिकेतील नावांनी ओळखलं जातं.

योगिता चव्हाण आणि सौरभ मार्च महिन्याच्या सुरुवातीला लग्नबंधनात अडकले होते. आता हळुहळू अभिनेत्री त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये योगिताने लेव्हेंडर रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : एक सुपरहिट गाणं, सलमान खान-अक्षयसह केलं काम; फिटमुळे करिअरवर झाला परिणाम, अभिनेत्रीने १० वर्षांपूर्वी…

योगिताच्या हातावर सौरभच्या नावाची सुंदर अशी मेहंदी रंगल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. या सगळ्या फोटोंमध्ये एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. ती म्हणजे योगिताच्या मेहंदीवर असणारा गोड संदेश. अभिनेत्रीने साकारालेली अंतरा मालिकेत रिक्षा चालवत असते आणि तिने तिच्या रिक्षाला ‘हमसफर’ असं नाव दिलेलं असतं. मालिकेत रिक्षातून प्रवास करता करता मल्हार-अंतरा यांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. अगदी त्याचप्रमाणे योगिताने तिच्या मेहंदीत ‘Forever Humsafar’ हा खास हॅशटॅग मेहंदीमध्ये लिहून घेतला होता.

हेही वाचा : पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, योगिताच्या या मेहंदी लूकवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हळद, मेहंदी पार पडल्यावर लग्नसोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी, हिरवा चुडा, गळ्यात दागिने असा पारंपरिक लूक केला होता. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत त्यावर वेलवेटची हिरवी शाल घेतली होती. दोघांचाही हा रॉयल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.