गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता लवकरच ‘जीव झाला येडापिसा’ फेम अशोक फळदेसाई आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम अभिनेत्री एतशा संझगिरी ही नवी जोडी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आला आहे.

अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री एतशा संझगिरी यांची नवी मालिका ‘सोनी मराठी’वर सुरू होणार आहे. ‘निवेदिता, माझी ताई’ असं या मालिकेचं नाव असून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो ‘सोनी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अशोक, एतशाबरोबर बालकलाकार रुद्रांश चोंदेकर पाहायला मिळत आहे. या नव्या मालिकेत अशोक ‘यशोधन’, एतशा ‘निवेदिता’ आणि रुद्रांश ‘असीम’च्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा – अनुष्का शर्माच्या भावानंतर ‘अ‍ॅनिमल’फेम तृप्ती डिमरी श्रीमंत उद्योगपतीला करतेय डेट? ‘या’ फोटोमुळे अफेअरच्या चर्चांना उधाण

‘सोनी मराठी’च्या या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी अशोक, एतशा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही जणांनी या नव्या मालिकेसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – Premachi Goshta: कोळी कुटुंबाने मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्यात आणली रंगत, प्रसाद सांगून दिली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक आणि एतशाची प्रमुख भूमिका असलेली ‘निवेदिता, माझी ताई’ ही नवी मालिका कधीपासून सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण प्रेक्षकांमध्ये या नव्या मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.