‘कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणारे स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी भरभरून बोलतता. खेळ सुरु असताना महानायक यांच्याबरोबर रंगणाऱ्या गप्पा ही या शोची खासियत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये हॉट सीटवरील एक स्पर्धक गेल्यानंतर शांभवी बंदल फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकत हॉट सीटवर बसली. तिने बिग बींना यावेळी एक सल्ला दिला.

आणखी वाचा – KBC 14 : १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचं स्पर्धकाने दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहितीये का?

शांभवी ही ठाणे परिसरात राहणारी महिला आहे. एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये ती कन्टेंट स्पेशालिस्ट म्हणून काम पाहते. ‘केबीसी १४’मध्ये हॉट सीटवर बसल्यानंतर तिने मेडिकल इंडस्ट्रीमध्येही काम करण्याबाबत बिग बींना सांगितलं. तिने याबाबत सांगताच अमिताभ यांनी तिला एक मजेशीर प्रश्न विचारला.

“एखादा व्हायरस लोकांची निवड करतो का?” असा मजेशीर प्रश्न अमिताभ बच्चन शांभवीला विचारतात. यावर तिही अगदी हसते. म्हणते, “व्हायरस वगैरे काहीच नसतं. कुठूनही जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा स्वतःला सॅनिटाईज करणं गरजेचं आहे.” यानंतर ती बिंग बींना एक सल्ला देते.

आणखी वाचा – Video : लेकाने दिलेलं ‘ते’ वचन, घट्ट मिठी मारली अन्…; अमिताभ बच्चन मंचावरच रडू लागले, भावुक व्हिडीओ एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती म्हणते, “सर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही इथे कित्येक लोकांना भेटता. जर एखाद्याला कोणता संर्सग झाला असेल तर तो संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो.” यावर बिग बी उत्तर देतात की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी माझ्या प्रेक्षकांमुळे आजारी पडलो तर स्वतःला भाग्यवान समजेन. माझ्या प्रेक्षकांमुळे मी आजारी पडेन किंवा मला कोणत्या प्रकारचा संसर्ग होईल याचं मी कधीच वाईट वाटून घेतलं नाही. मी त्यांच्याबरोबर हात मिळवताना मागे हटत नाही. कारण प्रेक्षक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.” बिग बींच्या या उत्तराने उपस्थितांचं मन जिंकलं एवढं नक्की.