‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा २६ फेब्रुवारीला पार पडला. साखरपुडा, हळद, मग लग्न असे एकापाठोपाठ एक विधी करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तितीक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

आज (२६ मार्च २०२४ रोजी) त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यासाठी तितीक्षाच्या मोठ्या बहिणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तितीक्षाची बहिण खुशबू हीसुद्धा नावाजलेली अभिनेत्री आहे. बहिणीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने खुशबूने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत तितीक्षा आणि सिद्धार्थ खुशबूच्या गालावर किस करताना दिसतायत. या सुंदर फोटोला कॅप्शन देत “तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन #one month anniversy” असं खुशबूने लिहिलं.

खुशबूने शेअर केलेल्या या फोटोवर तितीक्षाने “आय लव्ह यू” अशी कमेंट केली आहे. तर सिद्धार्थने हार्टचे इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. चाहत्यांनी “खूप गोड” आणि हार्ट इमोजी वापरत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… IPL च्या सामन्यादरम्यान श्वानाला लाथ मारल्यामुळे भडकला वरुण धवन; म्हणाला, “तो काही फुटबॉल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, खुशबू झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारते आहे. तर, बहिण तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये नायिकेच्या भूमिकेत दिसते. सिद्धार्थ ‘जे एन यू’ या चित्रपटात उर्वशी रौतेलाबरोबर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.