काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली. ‘लाखात एक आमचा दादा’ असं या नव्या मालिकेचं नाव असून या मालिकेत ‘झी मराठी’चा जुना आणि लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका अजय उर्फ अज्या म्हणजे अभिनेता नितीश चव्हाण नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या नितीश चर्चेत आला आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत ‘लागिरं झालं जी’मधला आणखी एक अभिनेता झळकणार आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो १० मेला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या प्रोमोमध्ये नितीशची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली होती. मोठमोठ्याने वाजणाऱ्या तुतारीबरोबर नतमस्तक होऊन प्रार्थना करणाऱ्या ‘आमचा दादा’ची झलक दिसली. नितीशच्या या एन्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण आता या नव्या मालिकेत नितीश बरोबर पाहायला मिळणाऱ्या त्या चार बहिणी कोण असणार? हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. अशातच या मालिकेत झळकणाऱ्या आणखी एका अभिनेत्याचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा – रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंमत असेल तर…”

‘लागिरं झालं जी’ मालिकेत पाहायला मिळालेला ‘टॅलेंट’ म्हणजेच अभिनेता महेश जाधव ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करून त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं होतं, “गणपती बाप्पा मोरया…नवीन गोष्ट, नवीन सुरुवात.” त्यानंतर महेश जाधवने दुसरी पोस्ट देखील केली. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – Video: “बोटिंग, जंगल सफारी अन्…”, मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला होता साजरा, प्रथमेशने दिलेलं खास सरप्राइज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महेश जाधवने उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. फलटणमध्ये त्याने स्वतःचा फूड ट्रक सुरू केला. ‘हॅलो शॉरमा’, असं फूड ट्रकचं नाव आहे. महेश ‘लागिरं झालं जी’नंतर अनेक मालिकांमध्ये पाहायला मिळाला. तसंच त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये काम केलं. याशिवाय तो ‘फकाट’ या चित्रपटातही झळकला.