‘लग्नानंतर होईलच प्रेम'(Lagnanantar Hoilach Prem) ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या,ही पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतेच नंदिनी व पार्थ यांचे लग्न ठरल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. त्यांचे लग्न ठरण्याआधीपासूनच जीवा व काव्या हे एकमेकांच्या प्रेमात आहेत. मात्र, याबद्दल त्यांच्या घरच्यांना त्यांनी अद्याप कल्पना दिली नाही. आता नंदिनी व पार्थ यांचे लग्न ठरल्यामुळे त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा झाला आहे, असे त्यांना वाटत आहे. मात्र, मालिकेत पुढे काय होणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या व जीवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स

सोशल मीडियावर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सहकलाकार विवेक सांगळेबरोबर ‘लव्हयापा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “ऑन पब्लिक डिमांड, काव्या आणि जीवा का लव्हयापा”, अशी कॅप्शन दिली आहे. याबरोबरच, कमेंटमध्ये जीवा व काव्याचा डान्स कसा वाटला, असा प्रश्नही अभिनेत्रीने विचारला आहे. ज्ञानदाने विवेक सांगळेच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.

ज्ञानदा रामतीर्थकर व विवेक सांगळे यांच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत या कलाकारांचे कौतुक केले आहे. “लय भारी”, “जीवा आणि काव्या जमलं. भारीच”, “झक्कास”, “जबरदस्त”, अशा कमेंट करत चाहत्यांनी कौतुक केले आहे. याबरोबरच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिकेत ज्ञानदाने काव्याची भूमिका साकारली आहे. विवेक सांगळेने जीवाची भूमिका साकारली आहे. तर लोकप्रिय अभिनेत्री मृणास दुसानीसने नंदिनी हे पात्र साकारले आहे. अभिनेता विजय अंदालकरने पार्थ हे पात्र साकारले आहे. कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. आता मालिकेत पुढे कोणते वळण येणार, काव्या व जीवा आणि नंदिनी व पार्थ एकत्र येऊ शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.