Lakhat Ek Amcha Dada : सध्याच्या काळात सोशल मीडियावर विविध गाणी ट्रेंड होत असतात. गेल्या काही दिवसांपासून रवीना टंडनच्या १९ वर्षीय लेकीचं म्हणजेच राशा थडानीचं ‘उई अम्मा’ गाणं सर्वत्र ट्रेडिंग आहे. या गाण्यातील राशाच्या एक्स्प्रेशन्स, तिचा डान्स या सगळ्या गोष्टी चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यामुळेच हे गाणं सर्वत्र चर्चेत आलं. नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण राशा थडानीच्या गाण्यावर थिरकल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता राशाच्या ‘उई अम्मा’ गाण्याची भुरळ मराठी कलाकारांना सुद्धा पडली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या सहा महिन्यांपासून ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरू आहे. ही मालिका गेल्यावर्षी जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये प्रेक्षकांना सूर्या दादा व त्याच्या कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका अभिनेता नितीश चव्हाण साकारत आहे. तर, मुख्य अभिनेत्री म्हणून या मालिकेत दिशा परदेशी झळकत आहे. तसेच सूर्या दादाच्या चार बहि‍णींची भूमिका मालिकेत कोमल मोरे ( तेजश्री ), समृद्धी साळवी ( धनश्री ), इशा संजय ( राजश्री ), जुई तनपुरे ( भाग्यश्री ) या अभिनेत्रींनी साकारल्या आहेत.

सूर्या दादाच्या चार बहि‍णींपैकी राजश्री आणि भाग्यश्री नुकत्याच राशा थडानीच्या ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या आहेत. या सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर या दोन ऑनस्क्रीन बहि‍णींनी कमाल एक्स्प्रेशन्ससह जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

इशा संजयने ‘उई अम्मा’ गाण्यावरचा डान्सचा व्हिडीओ शेअर करत याला ‘चुई मुई सी हिरनिया’ असं कॅप्शन दिलं आहे. सूर्या दादाच्या दोन्ही बहि‍णींचा हा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

A post shared by I S H A (@ishaasanjay)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सगळं सूर्या दादाला माहिती आहे का?”, “सूर्या दादाला कळालं तर लय वाईट वाटेल…”, “बाई काय डान्स करतात”, “ब्युटी विथ ब्रेन”, “तुम्ही दोघींनीही अतिशय सुंदर डान्स केला आहे”, “अद्भुत नृत्य सादरीकरण…”, “लय भारी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील अनेक कलाकार डान्सचे किंवा मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. यावरून या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन सुद्धा किती सुंदर नातं आहे हे पाहायला मिळतं.