स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कमी दिवसांतच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या कलाकारांचं नातं ऑन स्क्रीन जरी वेगळं असलं तरी ऑफ स्क्रीन यांची खूप धमाल सुरू असते. खरे बहिणी अनेकदा सोशल मीडियावर रील्स शेअर करताना दिसल्या आहेत; पण आता खरे कुटुंबानं एक मजेशीर रील चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

नयना, काजल आणि त्यांच्या आई-बाबांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यात कलाची आई तिच्या बाबांबरोबर भांडताना दिसत आहे; पण एका मूकपटाप्रमाणे दोघांच्या तोंडून एकही अवाक्षर निघत नाही आहे. भांडण सुरू असतानाच काजल आणि नयना “हाय बीपी हाय बीपी हाय हाय! हाय बीपी हाय बीपी हाय हाय! ये औरत मेरे बाप का बीपी बढाए जाय जाय जाय ! हाय बीपी हाय बीपी हाय हाय!” हे गाणं गाऊ लागतात.

खरे कुटुंबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नयना म्हणजेच अपूर्वा सकपाळ हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “ये औरत ना होती तो क्या होता”, असं एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं. तर “किशूताई, तुझी टीमपण एकदम जोरात आहे; पण मला तूच जास्त आवडतेस”, असं दुसऱ्यानं लिहिलं.

हेही वाचा… Video: नारकर कपलचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश नारकरांची एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले, “काका, जबरदस्त एकदम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच कला आणि अद्वैत मिळून राहुलचं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणणार. त्यानंतर राहुलला शिक्षा मिळणार का? मालिकेत पुढे काय घडेल? हे येणाऱ्या भागांत स्पष्ट होईल.