गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लगीनघाई पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वनिता खरातने तिचा बॉयफ्रेंड सुमीत खरातबरोबर लगीनगाठ बांधली. त्यांच्या लग्नातच अभिनेता निखिल बने आणि अभिनेत्री स्नेहल शिदम हे एकत्र पाहायला मिळाले. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि कॅप्शनमुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या फोटोमुळे ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चाही पाहायला मिळाल्या. अशातच आता निखिल आणि स्नेहलचा एका जुन्या फोटोवरील कमेंटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून निखिल बनेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी निखिल बने आणि ‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदम या दोघांनी एक गोड फोटो पोस्ट केला होता. यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे आहेत. त्यावेळी स्नेहल ही लाजताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसल्या. पण त्यावर निखिल बनने स्पष्टीकरण दिलं होतं. “मला सध्या खूप छान वाटतंय, कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत. आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय. आम्ही खूप दिवसांनी भेटलो की अनेकदा एकत्र फोटो काढतो. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि तसेच कायम राहू”, असे निखिल बने म्हणाला होता.

त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर त्यांचा जुना एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतही स्नेहल शिदम आणि निखिल बने पाहायला मिळत आहे. यावेळी निखिल हा कॅमेऱ्यात पाहत असून स्नेहल ही गोड हसत त्याच्याकडे पाहताना दिसत आहे.

“आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे ….” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याखाली त्यांनी ‘we r just friends’ असेही म्हटले आहे. या फोटोखाली महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने कमेंट केली आहे. त्यावर त्याने “Ummhmmm” असे म्हटले आहे.

nikhil bane old photo comment
निखिल बनेची कमेंट

आणखी वाचा : “आम्ही दोघंही…” स्नेहल शिदमबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर स्नेहलने “पृथ्वीक तुला तर माहिती आहेच”, अशी कमेंट केली आहे. यापाठोपाठ निखिल बनेने या फोटोवर ‘डार्लिंग’ असे म्हणतं तीन रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्यांच्या या जुन्या फोटोवरुन अनेकजण त्या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच सुरु आहे, असं बोलताना दिसत आहे. पण अद्याप त्या दोघांनी यावर शिक्कामोर्तब केलेला नाही.