मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला राजकीय क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली. पण त्याचबरोबरीने मराठीमधील कलाकरांनी या दीपोत्सवाला हजेरी लावत सण साजरा केला. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, महेश कोठारे, प्राजक्ता माळी यांसरख्या मंडळींनी दीपोस्तवाला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची टीम या दीपोस्तवामध्ये सहभागी झाली. यावेळी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थवरही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम पोहोचली. याबाबतच वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – मनसोक्त गप्पा, खास फोटो अन्…; राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’वर पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम

निखिल बने, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, सचिन गोस्वामी, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, चेतना भट, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव अशा संपूर्ण टीमने राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा अनुभव त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला. यावेळी वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’वर पोहोचली.

राज ठाकरे व त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत ती म्हणाली, “यावर्षीची दिवाळी खरंच खूप खास होती. कारण शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून कित्येक वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहिली ती गोष्ट घडली. शिवतीर्थावर जाण्याचा योग आला.”

आणखी वाचा – ४३व्या वर्षी अमृता सुभाष होणार आई, प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कट्टा ते शिवतीर्थ हे दोन मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी १० वर्ष गेली. कलेवर आणि कलाकारांवर मनापासून प्रेम करणारा “राजा माणूस” भेटला. राज साहेबांचं भेटणं, किस्से सांगणं, आमच्या कार्यक्रमावर असलेलं त्यांचं प्रेम हे सगळं भारावून टाकणारं होतं. हे सगळं हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे शक्य झालं.” वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेनेही राज ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत एक स्वप्न पूर्ण झालं असल्याचं म्हटलं आहे. तसेच वनिताची पोस्ट पाहता सुमितनेही कमेट करत तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनचं कौतुक केलं आहे