‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून ओंकार भोजने हा ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. ओंकार भोजने हा कविता प्रेमी आहे. नुकतंच त्याच्या कवितेचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका कार्यक्रमात त्याने चिपळूण गावाबद्दल कविता म्हटली. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा

ओंकार भोजनेची कविता

“टॅलेंटची आमच्या गावभर चर्चा
नाही खोटेपणाचा आव रे
कुणी निंदा, कुणी भी वंदा
चिपळूण आमचं गाव रे…”

ओंकार भोजनेने या कार्यक्रमावेळी तरुणांना एकजुटीने राहण्याचे आवाहनही केले. “आपण सर्व तरुण पिढी आता ज्याप्रमाणे एकत्र आहे, तीच उर्जा आणि एकजुट यापुढेही टिकून राहायला हवी. कारण त्यावरच सर्व अवलंबून आहे. एकटं राहून काहीही होत नाही. त्यामुळे आपण एकत्र राहूया”, असे ओंकारने म्हटले.

आणखी वाचा : “त्याने आधी येऊन सांगितलं असतं तर…” ओंकार भोजनेच्या एक्झिटवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाने मांडलेले मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ओंकार भोजनेला कविता करण्याची फार आवड आहे. आता लवकरच तो ‘कलावती’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमात एण्ट्री केली. मात्र हा कार्यक्रमही फार काळ चालला नाही.