छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे गौरव मोरे. फिल्टरपाड्याच्या बच्चन अशी ओळख मिळवून गौरवने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो.

हास्यजत्रेतून लोकप्रियता मिळविलेल्या गौरवचा चाहता वर्ग मोठा आहे. गौरव सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. एअरपोर्टवरील या फोटोमध्ये गौरव पाठमोरा उभा असून पुन्हा विमानाने प्रवास करणार असल्याचं दिसत आहे. या फोटोला त्याने “चल कही दूर निकल जाये”, असं कॅप्शन दिलं आहे. याआधी गौरव चित्रपटाच्या शुटिंगनिमित्त लंडनला गेला होता. त्यामुळे तो पुन्हा लंडनला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा>> “माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट

हेही वाचा>> “इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत

गौरवच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी गौरवचा या फोटोमध्ये पठाण चित्रपटातील शाहरुख खानसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी गौरवला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> बेडवरील फोटो शेअर केल्यामुळे ‘तारक मेहता’ फेम प्रिया अहुजा ट्रोल; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिल्टरपाड्याचा बच्चन जाहिराती व मराठी चित्रपटांतही झळकला आहे. काही दिवसांपूर्वीच गौरवने त्याच्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला होता. तर ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात गौरवने अभिनेता सिद्धार्थ जाधवसह स्क्रीन शेअर केली होती.