छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि चर्चेत असणार कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं जात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र पुरती मर्यादित न राहता जगभरातील कानकोपऱ्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मराठी सिनेसृष्टीला उत्कृष्ट कलाकार दिले आहेत. या कलाकारांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात. नुकताच वनिताने इन्स्टाग्रामवर जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – प्रथमेश लघाटेने बायको मुग्धा वैशंपायनच्या वाढदिवसानिमित्ताने केली खास पोस्ट, म्हणाला….

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यावर कलाकारांनी अनेक मजेशीर व्हिडीओ केले; जे सध्या कलाकारमंडळी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. यापैकी आता एक व्हिडीओ वनिता खरातने शेअर केला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर वनिता ओंकार राऊतसह अक्षय कुमार व रवीना टंडन यांच्या ‘तू चीज बडी है मस्त’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

वनित व ओंकारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून वनिता सलमान खानची बहीण अर्पिता खानसारखी दिसत असल्याचं म्हणाले. तसंच काही नेटकऱ्यांनी दोघांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – विजय चव्हाणांचे ‘असे’ होते शेवटचे दिवस, हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना लेकाचं लग्न पाहण्याची केली इच्छा अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ व्यतिरिक्त नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत ती पाहायला मिळत आहे. याशिवाय वनिताने आपल्या अभिनयाचा ठसा हिंदीतही उमटवला आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील वनिताची भूमिका चांगलीच गाजली होती.