अभिनेत्री वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. पण त्याचबरोबरीने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं. कामामुळे चर्चेत असणारी वनिता आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता वनिताची लगीन घाई सुरु झाली आहे.

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं. इतकंच नव्हे तर दिवाळी सणही या दोघांनी एकत्र साजरा केला. आता लवकरच ती सुमितबरोबर लग्न करणार आहे. वनिताने तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली आहे.

बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करताच वनिता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना होता. ‘राजश्री मराठी’च्या वृत्तानुसार, वनिता फेब्रुवारी २०२३मध्ये लग्न करणार आहे. सध्या तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. तिचं लग्न कुठे असणार, लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

आणखी वाचा – Video : …अन् मॅरेथॉनमध्ये धावली ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परी, व्हिडीओ पाहून नेटकरीही करताहेत कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.