‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना तिला कुटुंबियांची उत्तम साथ मिळाली. तिने एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं. सध्या नम्रता अमेरिका दौऱ्यावर आहे. ती ‘कुर्रर्रर्र’ नाटकाच्या प्रयोगांसाठी अमेरिकेला गेली आहे.

नम्रतासह विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आदी कलाकारही या नाटकाच्यानिमित्ताने परदेश दौरा करत आहेत. दरम्यान नम्रता तिच्या मुलाच्या आठवणींमध्ये भावुक झाली आहे. नम्रताने तिचा मुलगा रुद्राजचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुद्राज “एकटी एकटी घाबरलीस ना…” गाणं बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीची हिंदी मालिकेमध्ये एंट्री, प्रोमो पाहून प्रार्थना बेहरेची कमेंट, म्हणाली, “बेबी…”

रुद्राजचा व्हिडीओ शेअर करताना नम्रता म्हणाली, “एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही…”. हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे पाणवतात. लवकरच परत येतेय. कधी एकदा तुला घट्ट मिठी मारते असं झालंय. कारण मी खरंच शूर नाही हे मी इतकं लांब आल्यावर माझ्या लक्षात आलं”.

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव मोरेचा सतत अपमान का होतो? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “कधी कधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कारण क्षणोक्षणी तुझी आठवण आली. पण आता मला खात्री आहे माझा सगळा भित्रेपणा छूमंतर होणार. कारण लवकरच मी माझ्या शूर बाळाला भेटणार आहे”. अमेरिकेमध्ये नम्रताला तिच्या मुलाची आठवण सतावत आहे. नम्रताने शेअर केलेल्या रुद्राजच्या व्हिडीओला दोन तासांमध्येच तीन हजारांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.