मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकतंच अभिजीत खांडकेकरने त्याच्या पहिल्या शिवीचा किस्सा सांगितला आहे.

अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकताना दिसत आहे. नुकतंच अभिजीतने ‘लोकमत’ या वृत्तपत्राच्या युट्यूबला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्याने हटके पद्धतीने उत्तर दिली.
आणखी वाचा : रुपाली चाकणकरांच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण, पहिल्या चित्रपटाचे नाव ठरले, पोस्टर चर्चेत

यावेळी अभिजीतला पहिल्या शिवीबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, “शिवी देणं हे फार वाईट असतं. आपल्याला लहानपणापासून वाईट शब्द वापरु नयेत असं शिकवलं जातं”, असे सांगतच त्याने त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला.

“मी शाळेत NCC चे कॅम्प्स करत होतो. त्यावेळी वेगवेगळ्या भागातून तिथे मुलं आलेली असायची. त्यामुळे अनेक शिव्या या कानावर पडायच्या आणि नकळत कधीतरी त्या तोंडात यायच्या. त्या कधी तोंडात यायच्या हे तुम्हालाही कळायचे नाही. मी १५ दिवसांनी NCC चे कॅम्प्स करुन घरी आल्यानतंर मोठी पंचाईत व्हायची. घरी आल्यानंतर तोंड सांभाळून बोलावं लागायचं.

त्यावेळी अत्यंत कॉमन शिवी जी अनेकदा दिली जाते. त्या शिवीला कोणीही शिवी समजत नाही. तो एक मानवाचा स्थायीभाव किंवा स्वभावाचा भाग समजला जातो. ती शिवी म्हणजे चु***! काय चु*करतोय, काय चु* चालवली आहे, असे आम्ही अनेकदा बोलायचो. त्यावेळी त्याचा अर्थ माहिती नव्हता. पण आजही मित्रांच्या बोलण्यातून ही शिवी अनेकदा ऐकतो.” असे अभिजीत खांडकेकरने सांगितले.

आणखी वाचा : मला काम करुन ट्रोल व्हायला आवडेल- अभिजीत खांडकेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिजीत खांडकेकर सध्या ‘तुझेच गीत मी गात आहे’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. यात तो मल्हार कामतची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याची ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत टॉप १० मध्ये पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षक याला उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत.