स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच ते एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

मिलिंद गवळी यांनी नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यात त्यांनी सुंदर कुर्ता परिधान केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी कष्ट आणि मेहनत याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका का सोडली? अतिशा नाईकने सांगितलं खरं कारण, म्हणाली “मला पश्चाताप…”

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“असेल हरि तर देईल खाटल्यावरी” किंवा “नशिबात असेल तर मला मिळेल” असं म्हणून चालत नाही. तुम्हाला स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे.

कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही, कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे, कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं,

Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctual कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन च नाव घेतलं जातं शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं.

तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला , तुमचं काम कष्टाच वाटत नाही, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते की ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल “अरे यार आज शूटिंग आहे” शूटिंगचा मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन, आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो , अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही, तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशय मध्ये असते, सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते,

दर्शना हजारे शानबाग ने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेत मध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजू मध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : गुपचूप साखरपुड्यानंतर अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या पहिल्या केळवणाचा थाट, फोटो समोर

दरम्यान मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.