अभिनेता सुयश टिळकनं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक आहे. त्यानं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. खऱ्या अर्थाने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत सुयशनं साकारलेली जयराम भूमिका चांगलीच गाजली.

अलीकडेच सुयश ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘अबोली’ मालिकेत झळकला. या मालिकेत त्यानं सचित राजेची भूमिका साकारली होती. पण या भूमिकेत सुयश १५ वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळाला. कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात दिसला. सुयशच्या या भूमिकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘अबोली’ मालिकेनंतर सुयश नव्या रुपात नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

thoda tujha thoda majha new marathi serial coming soon on star pravah Title song sung by Aarya Ambekar and Nachiket Lele
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच येतेय आणखी एक नवी मालिका, आर्या आंबेकर व नचिकेत लेले यांनी गायलं शीर्षकगीत
bhagya dile tu mala fame actress Surabhi Bhave coming soon in new role in new serial Abeer Gulal
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीची कलर्सच्या नव्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत वर्णी, पोस्ट करत म्हणाली, “लवकरच…”
subodh bhave new marathi serial tu bhetashi navyane with shivani sonar
‘तू भेटशी नव्याने’ : सुबोध भावेची नवीन मालिका! शिवानी सोनारसह साकारणार प्रमुख भूमिका, जबरदस्त प्रोमो प्रदर्शित
Tharala Tar Mag Fame amit bhanushali will entry Mi Honar Superstar Jodi Number 1 show
Video: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली झळकणार नव्या भूमिकेत! पाहा व्हिडीओ
Marathi actor Sameer Paranjape will lead role in shivani surve new serial Thod Tuz Ani Thod Maz
तो पुन्हा येतोय! शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Lakhat Ek Amcha Dada new marathi serial coming soon in zee marathi
‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ नंतर ‘झी मराठी’ लवकरच येतेय ‘ही’ नवी मालिका, पाहा जबरदस्त प्रोमो
amchya papani ganpati anala fame sairaj entry in zee marathi serial
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, येणार ७ वर्षांचा लीप
Thipkyanchi Rangoli fame actress Sai Kalyankar entry in Shubh Vivah marathi serial
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

हेही वाचा – “नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”

‘सन मराठी’ वाहिनीवर ‘आदिशक्ती’ नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच मालिकेत मुख्य भूमिकेत सुयश टिळक झळकणार आहे. त्याच्या साथीला ‘देवयानी’ मालिकेत झळकलेला अभिनेता सुश्रुत मंकणी पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री पल्लवी पाटील, अंबरीश देशपांडे, बालकलाकार सावी केळकर दिसणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील गावकऱ्याला वाचवण्याचा सीन ‘असा’ झाला होता चित्रीत, सुमीत पुसावळेनं शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, सुयश टिळकची ‘आदिशक्ती’ नवी मालिका ६ मेपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘सन मराठी’वर ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे.