आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण आपल्या कुटुंबीयांबरोबर गुढी उभारत, त्याचबरोबर शोभायात्रेत सहभागी होत गुढीपाडवा साजरा करत आहेत. अनेक कलाकार देखील शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत असतात. तर आता कोल्हापूर येथील शोभायात्रेत अभिनेत्री अमृता पवार हिने दांडपट्टा चालवला.

अमृता पवार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री. ती सध्या ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. अशातच ती शोभायात्रेतील तिच्या व्हिडीओमुळे खूप चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा वनिता खरातसाठी असणार खास; नवीन वर्षासाठी केला ‘हा’ संकल्प

आज सकाळी अमृता गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूर येथील एका शोभायात्रेत सहभागी झाली होती. लाल रंगाची सुंदर साडी नेसून आणि केसात गजरा माळून ती शोभायात्रेत सहभागी झाली. तिने तिथे नुसतीच हजेरी लावली नाही तर तिची कोणालाही माहीत नसलेली तिची बाजू या शोभात्रेतून समोर आली. या शोभायात्रेत तिने दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक केलं. तिला दांडपट्टा चालवताना पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.

हेही वाचा : Video: गुढीपाडव्याच्या दिवशीही अमृता खानविलकरला आवरला नाही आवडत्या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण आवाक् झालेले पाहायला मिळाले. या व्हिडिओवर कमेंट करत सर्वजण आता तिचं कौतुक करत आहेत.