छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आली. ती कायमच चर्चेत असते. अपूर्वा ही कायमच तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगताना दिसते. नुकतंच अपूर्वाने तिच्या ओळखीतील एका कुटुंबातील पाळीव पोपटाचा किस्सा सांगितला आहे.

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती ओळखीतील एका काकूंची गोष्ट सांगताना दिसत आहे. यात त्या काकू सिंगल आहेत. त्यांच्या घरातील पोपटाला व्हिस्की आवडते, असे तिने यात सांगितले.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

यावेळी ती म्हणाली, “मी एका काकूंना ओळखते. त्यांनी लग्न केलेले नाही. त्या अजूनही सिंगल आहेत. त्यांच्याकडे एक पोपट आहे. तो व्यवस्थित बोलतो. त्याला पुरुष अजिबात आवडत नाही. त्याला घरात आलेले पुरुषही अजिबात पटत नाही. त्याला रोज संध्याकाळी छोट्याशा ग्लासात व्हिस्की द्यावी लागते. त्याचे खूप लाड आहेत.

तो त्यांच्या घरात पुरुष आणि महिला जर एकत्र आले तर आधी तो नाव विचारतो. तो त्या महिलेचे वेलकम करतो. तो पोपट हा एखादी महिला आली तर आय लव्ह यू आय लव्ह यू असे म्हणतो आणि तो त्या पुरुषाकडे बघून आय हेट यू आय हेट यू असे म्हणतो”, असा किस्सा तिने यावेळी सांगितला.

आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अपूर्वाने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत घरातील सदस्यही तिचा हा किस्सा ऐकताना दिसत आहे. ती हा किस्सा सांगत असताना घरातील सदस्य हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.