चित्रपट, नाटक, मालिका या सर्वच माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अतिशा नाईक. मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ‘आभाळमाया’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ती झळकली. नुकतंच अतिशा नाईकने तिच्या वडिलांच्या निधनानंतर आलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केले.
अतिशा नाईकने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचे वडील गेल्यानंतर तिला माणसांची किंमत कळली, असे वक्तव्य केले. त्यावेळी ती भावूकही झाली.
आणखी वाचा : “…तर माझ्या आईच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडले असते”, रंगावरुन होणाऱ्या भेदभावावर मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या “गोरं व्हायचं क्रीम…”
“माझे वडील जेव्हा अपघातात गेले, तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आदल्या दिवसापर्यंत मी कधीही माझ्या कपड्यांच्या घड्या केल्या नव्हत्या. मला शाईची बाटली त्याची किंमत किती, ते कुठे मिळतं, याबद्दल माहिती नव्हती. मला तेव्हा कशाचीच किंमत माहिती नव्हती. पण बाबा गेल्यानंतर माणसांची काय किंमत आहे, हे एका क्षणात लक्षात आलं.
आज हा माणूस आपल्यात नाही जो आपला सगळ्यात मोठा आधार होता. काल काही काळापूर्वीपर्यंतचा आहे हा शब्द भूतकाळात जातो. तो वर्तमानातून भूतकाळात जाणं म्हणजे आहे च होतं होणं, त्या काळात मला संपूर्ण किंमत कळली”, असे अतिशा नाईकने सांगितले.
आणखी वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका का सोडली? अतिशा नाईकने सांगितलं खरं कारण, म्हणाली “मला पश्चाताप…”
दरम्यान अतिशा नाईक ही विविध मालिकांमध्ये झळकली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने साकारलेली इंदुमतीची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत जयदीपच्या आईच्या भूमिकेत झळकली. तिचे हे पात्र चांगलेच गाजले.