मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्राजक्ता अनेकदा तिचे फोटो, कामाबद्दलची माहिती शेअर करत असते.

प्राजक्ताने नुकतंच काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. प्राजक्ताने फोटोमध्ये लाल रंगाची साडी नेसली आहे. मोत्याचे दागिने घालून तिने पारंपरिक लूक केला आहे. या फोटोला तिने ‘ये लाल इश्क…ये मलाल इश्क’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>> ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण

प्राजक्ताच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमुळे ती प्रेमात पडली आहे की काय, अशी चर्चा रंगली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> अवघ्या एका महिन्याच्या लेकीला घरी सोडून आलिया भट्ट करतेय योगा; नेटकरी म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळविलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ याशोचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताला नृत्याची आवड असून ती एक उत्तम नृत्यांगणा आहे. प्राजक्ताने अनेक मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लकडाऊन लग्न’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.