मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही कायमच चर्चेत असते. ऋतुजाने सिनेसृष्टीत स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमधून ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच ऋतुजाने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याबरोबर तिने गळ्यात छान नेकलेसही घातला आहे. हे फोटोशूट करताना ऋतुजा ही हातात हिल्स घेऊन उभी असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : Video : मनसेच्या नव्या पक्षगीतावर थिरकली प्राजक्ता माळी, नेटकरी म्हणाले “गाण्यावर नाचून…”

तिने या फोटोला मजेशीर कॅप्शन दिले आहे. “हिल्सने पाय दुखल्यावर मी”, असे कॅप्शन ऋतुजाने या फोटोला दिले आहे. या फोटोत ती पायाला हात लावून हिल्स काढत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “…म्हणूनच मी सुयश टिळकशी लग्न केले” पत्नीने सांगितले खरं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋतुजाचा हा फोटो पाहून आणि कॅप्शन पाहून अनेक लोक कमेंट करताना दिसत आहे. ‘फारच मस्त’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेकांनी त्यावर इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान ऋतुजाने नाटक, मालिका, चित्रपटांतून अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तिचा हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधताना दिसत आहे.