यंदा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व चांगलेच गाजले. अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अभिनेत्री राखी सावंतने ९ लाख रुपये घेत बिग बॉसमधून एक्झिट घेतली. नुकतंच बिग बॉसमधील सर्व कलाकारांचे रियुनियन पाहायला मिळाले. त्यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉसच्या घरात किरण माने आणि राखी सावंत यांच्या मैत्रीची जबरदस्त चर्चा रंगली होती. नुकतंच त्या दोघांनी कलर्स मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यानिमित्ताने किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बिग बॉसच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : “आज या किरण्याला हरण्याच्या…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
किरण मानेंची पोस्ट
“कलर्स मराठी ॲवॉर्डस् सोहळ्यात राखी भेटली. ‘बिगबॉस’मध्ये झालेली माझी एक निखळ मैत्री ! शो मध्ये आम्ही फूल्ल धम्माल केली. पण आमची जोडी, आमचं मजेशीर फ्लर्टिंग, हे सगळं बाहेर प्रचंड पाॅप्यूलर झालंय, हे आमच्या गांवीही नव्हतं. बाहेर आल्यावर शेवटचे दहा बारा एपिसोड पाहून चकितच झालो… आमची मैत्री खरीखुरी होती, फक्त काॅन्टेन्टसाठी नव्हती. याचा भक्कम पुरावा म्हणजे, ९ लाख रूपये असलेली बॅग तिच्याऐवजी मी घ्यावी यासाठी तिनं कळकळीनं, परोपरीनं प्रयत्न केले. मला ते पैसे मिळावेत अशी तिची लै लै लै इच्छा होती.
बॅग घेऊन बाहेर आल्यावरही ती तेजस्विनीला म्हणाली की हे पैसे किरणला मिळायला हवे होते. अर्थात मी ती बॅग घेणार नव्हतो कारण मला सपोर्ट करणार्या, माझ्यासाठी व्होटिंग करणार्या माझ्या चाहत्यांचा मला अपमान करायचा नव्हता. पण राखीने माझ्यासाठी स्वत:च्या ९ लाख रूपयांचा त्याग करायची तयारी दाखवली होती, हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. सोपं नसतं हे गड्याहो ! मला बिगबाॅसनं खूप काही दिलं, त्याचबरोबर ही मोठ्या मनाची नितळ मैत्रीणही दिली…लब्यू राखी !”, असे किरण मानेंनी यात म्हटले आहे.
आणखी वाचा : आर्या आंबेकरला झाला घशाचा संसर्ग, स्वत: दिली माहिती, म्हणाली “मी माझे…”
दरम्यान बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ मध्ये ठरले. अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.