‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री मृणाल दुसानिसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये तिने लग्नगाठ बांधली. यानंतर काही वर्षांनी मृणालने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. आता तब्बल ४ वर्षांनी ती भारतात परतली आहे.

भारतात आल्यावर मृणालने सर्वप्रथम नाशिक येथील गोदाघाटावर दर्शन घेतलं. सध्या सर्वत्र अभिनेत्री भारतात परतल्याची चर्चा चालू आहे. अशातच मृणालने तिच्या जुन्या मैत्रिणीची भेट घेतली आहे. त्या मैत्रिणीचं नाव आहे नेहा शितोळे. ‘तू तिथे मी’ या मालिकेत मृणालने मंजिरी, तर अभिनेत्री नेहा शितोळेने नेत्रा ही व्यक्तिरेखा साकारली होती. २०१४ मध्ये ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित केली जायची.

हेही वाचा : लेकीच्या लग्नात आईला अश्रूला अनावर अन् बाबा…; पूजा सावंतच्या लग्नाला १ महिना पूर्ण! शेअर केला खास व्हिडीओ

नेहा शितोळेने मृणालबरोबर खास फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, “आम्ही दोघी काहीशा थकलेल्या दिसत आहोत आणि खरंच थकलो होतो. पण, एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा भेट झाली याचा मला प्रचंड आनंद झाला आहे. हा फोटो खास ‘तू तिथे मी’ मालिकेच्या चाहत्यांसाठी आहे.”

हेही वाचा : आता नाटकाची जागा Reelsने घेतली; प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “काळ बदलला अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mrunal
मृणाल दुसानिस आणि नेहा शितोळे

दरम्यान, चार वर्षांनी भारतात परतल्यानंतर मृणाल दुसानिसने आता भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. असं तिने नुकतंच एबीपी माझा या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलं. तसेच लवकरच ती मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचंही ती म्हणाली. “प्रेक्षक मला आगामी प्रोजेक्टबद्दल विचारत आहेत. सध्या मी चांगल्या संधीची वाट बघत आहे. सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे तसेच नाटकातही काम करायला आवडेल” असं मृणालने सांगितलं आहे.