काही दिवसांपूर्वी ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमध्ये महासंगीत सोहळा पाहायला मिळाला. या सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’ परिवारातील लोकप्रिय जोड्यांनी डान्स केला. त्यापैकी एक म्हणजे मुक्ता आणि सागर.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता आणि सागरने ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील महासंगीत सोहळ्यात पाहायला मिळाले होते. सागर हा पार्थचा खास मित्र असतो. त्यामुळे सागर मुक्ताला घेऊन पार्थ आणि नंदिनीच्या संगीत सोहळ्याला आवर्जून हजेरी लावतो. एवढंच नव्हे तर दोघं संगीत सोहळ्यात थिरकतात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महासंगीत सोहळ्यात सुरुवातीला मुक्ता आणि सागरने लोकप्रिय कोळी गाण्यावर नृत्य केलं. ‘वेसवची पारू’ या गाण्यावर दोघांनी डान्स केला. त्यानंतर ‘गुलाबाची कळी’ या गाण्यावर मुक्ता आणि सागर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी खास कोळी पेहराव केला होता.

मुक्ता आणि सागरच्या या डान्सचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “खूप छान”, “एकच नंबर”, “मस्त”, “तुम्ही दोघं खूप छान करता. ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात दोघांचा डान्स पाहण्याची आता खूप उत्सुकता आहे”, “सर्वोत्कृष्ट डान्स”, “मुक्ता खूप चांगली डान्सर आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या एक्झिटचा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. टीआरपीच्या यादीत दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता पाचव्या स्थानावर गेली आहे. या मालिकेचा मोठ्या प्रमाणात टीआरपी घसरला आहे. तसंच आता १० फेब्रुवारीपासून मालिकेची वेळदेखील बदलण्यात आली आहे. प्रेमाची गोष्ट मालिका आता संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होतं आहे.