सुप्रसिद्ध मराठी गायक आणि संगीतकार म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. मराठीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याने काम केले आहे. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अवधूतने त्याचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याबरोबरच त्याने त्याच्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे.

अवधूत गुप्तेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही माणसं ही बोटीत हवा भरताना दिसत आहे. यावेळी अवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर हे बोट वल्हवताना दिसत आहेत. त्याबरोबरच अवधूत गुप्ते हा नदीत पोहोण्याचा आनंदही घेताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मराठी बोलायला लाज वाटते का?” सई ताम्हणकरचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली “आम्ही कोणत्या भाषेत…”

या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. “दरवर्षी धरण भरलं की पाणी गळाभेट घ्यायला आल्यासारखं डोंगराच्या पायथ्याशी यायचं आणि मी सुद्धा पाय बुचकळून तासनतास बसायचो! दरवर्षी मनात यायचं की ह्यापेक्षा जास्त जवळ जायला हवं त्याच्या.. पण त्यासाठी स्वतःची बोट असायला हवी. मनात आलं, की टाकली पाण्यात आणि सुरुवात केली वल्हवायला! मोठ्या स्वप्नांच्या मागे धावत असताना छोटी स्वप्न पूर्ण करायचं राहूनच जातं.. झालं!! त्यातलं हे एक पूर्ण केलं!!! ते सुद्धा स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब सारख्या मित्रांच्या साथीनं…”, असे कॅप्शन अवधूतने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधूतच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. ‘मस्तच भावा’, ‘निर्सगाची किमया अपार आहे’, ‘आनंद घेतला पाहिजे’, ‘अजून काय हवं’, अशा कमेंट त्याच्या व्हिडीओवर दिसत आहेत. अवधूत गुप्तेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.