‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. १८ मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेला येत्या चार दिवसांत दोन महिने पूर्ण होतील. अवघ्या काही दिवसांत ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस करून घेतलं आहे. मग ते एजे, लीला असो किंवा दुर्गा मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे अभिनेता राकेश बापटने साकारलेला एजे (अभिराम जहागीरदार) आणि अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. सध्या मालिकेत एजेच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आता एजेचं लग्न लीलाबरोबर नाहीतर श्वेताबरोबर होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेत जहागीरदार कुटुंब एजेच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र असलेलं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” चिन्मय मांडलेकर, क्षिती जोगच्या ट्रोलिंगवरून भडकला पुष्कर श्रोत्री, म्हणाला, “ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत…”

एजेच्या हळदी सोहळ्यात लीला तिच्या डान्स ग्रुपबरोबर एक खास डान्स करताना दिसणार आहे. पण जहागीरदार कुटुंबापासून लपण्यासाठी लीला ओढणीने अर्ध तोंड झाकून डान्स करताना पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

‘मराठी सीरियलस ऑफिशअल’ या इन्स्टाग्राम पेजवर लीलाचा एजेच्या हळदी सोहळ्यातील डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लीला पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत असून ‘गुलाबाची कळी’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. लीलाच्या या डान्सचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा – नऊ महिन्यातच ‘ही’ लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार! ‘या’ दिवशी शेवटचा भाग प्रदर्शित होणार

हेही वाचा – रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंमत असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण हळदी सोहळ्यात लीला आणि एजे समोरासमोर येणार आहेत? यावेळी एजेची आणि जहागीरदार कुटुंबाची काय रिअ‍ॅक्शन असते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय एजेचं लग्न श्वेताशी होणार की लीलाशी हे देखील येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, एजेचा हळदी सोहळा १५ मेला पाहायला मिळणार आहे. आता या हळदी सोहळ्यात नेमकं काय-काय घडतं? हे पाहणं उत्कंठावर्धक आहे.