अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नेहा मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरीही, सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहा शेवटची ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव अभिनेत्रीने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

हेही वाचा : झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद? ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा घेणार निरोप

‘मे आय कम इन मॅडम’ या लोकप्रिय मालिकेचं पहिलं पर्व २०१७ मध्ये संपलं. आता पुन्हा एकदा तब्बल ६ वर्षांनी या मालिकेचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा पेंडसेने या मालिकेच्या पहिल्या पर्वात महत्त्वाची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना नव्या पर्वाची माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक

‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेचं दुसरं पर्व नुकतंच स्टार भारत या वाहिनीवर सुरु झालं. याबद्दल सांगताना अभिनेत्री लिहिते, “५ वर्षांचा दुरावा आता संपणार कारण ‘मे आय कम इन मॅडम’ मालिकेचे नवे भाग तुमच्या भेटीला पुन्हा आले आहेत. मला आशा आहे की, तुम्हाला हे सगळे भाग आवडतील. बरोबर ९.३० वाजता भेटूया स्टार भारतवर…”

हेही वाचा : Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहाच्या चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार आहे. यामध्ये ती संजना हितेशी हे पात्र साकारते. या मालिकेमध्ये नेहासह संदिप आनंद, सपना सिकरवार, दिपेश भान, अनुप उपाध्याय, सोमा राठोड या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.