Zee Marathi Paaru Serial : ‘पारू’ मालिकेचा महासंगम नुकताच पार पडला. यामध्ये आदित्य आणि अनुष्काचा भव्यदिव्य साखरपुडा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. महासंगमनंतर ‘पारू’ मालिकेत दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं, यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि सेलिब्रेशनचं अजून एक कारण होत ते म्हणजे घराघरांत लोकप्रिय झालेली आपली लाडकी ‘पारू’ आता महाराष्ट्राची मॉडेल होणार आहे.

‘पारू’ पुन्हा एकदा ‘किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज’ची ब्रँड अँबॅसेडर होणार आहे. अनुष्का पारूला म्हणते, “किर्लोस्कर कंपनी लवकरत पाण्यात बुडणारे…” पारू धाडसाने अनुष्काला सामोरी जाते आणि तिला सडेतोड उत्तर देत म्हणते, “पंधरा दिवसांच्या आत मी तुला किर्लोस्करांच्या घरातून बाहेर फेकून देईन.” यामुळे या दोघींच्या शत्रुत्वाला आणखी धार येणार आहे. पारू थेट अनुष्काला आव्हान देते. आता अनुष्का पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते. पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते.

तर, दुसरीकडे दिशाची मालिकेत रि-एन्ट्री होणार आहे. ती किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल. त्या एका मॅगझिनचं कव्हर पेज पाहतात आणि कुटुंबीयांना म्हणतात, “याला काय अर्थ आहे? एका वेगळ्याच कंपनीची जाहिरात मॅगझिनच्या कव्हरवर छापून आलीये आणि आपल्या कंपनीच्या जाहिरात बॅक-कव्हरवर छापलीये.”

पारूला पुन्हा एकदा दिमाखात किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. अनुष्काचा खरा चेहेरा आता पारू सर्वांसमोर आणणार आहे. अनुष्काचा खरा चेहेरा समोर आल्याने पारु आणि अनुष्कामध्ये सुरु झालीये अस्तित्वाची लढाई… तर, जेलच्या बाहेर येऊन दिशाने थेट अहिल्या किर्लोस्करांना आव्हान दिलं असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भव्य कार्यक्रमात ब्रँड अँबॅसेडर पारूचं मोठं पोस्टर रिव्हिल करण्यात येणार आहे. या समारोहात दिशा आणि अनुष्काच नातं सगळ्यांसमोर येईल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. याशिवाय दिशाने किर्लोस्कर कुटुंब संपवण्यासाठी एक मोठा डाव रचला आहे. या समारंभात दिशाने बॉम्ब ठेवलेला आहे. आता दिशाने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य डीफ्युज करतील की, या सगळ्यात कोणाचा जाईल? या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना ‘पारू’ मालिकेच्या आगामी भागात मिळतील.