‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या महिन्यात सुरू झालेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ४ सप्टेंबरला सुरू झालेल्या तेजश्री प्रधानच्या या मालिकेला आज एक महिना पूर्ण होत आहे. ही मालिका सुरू होताच टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचली होती. पण त्यानंतर पुन्हा मालिकेचा टीआरपी घसरला आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिलं स्थान मिळवलं. त्यामुळे सध्या टीआरपीच्या शर्यतीत या मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळतं आहे.

सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत नवी एन्ट्री झाली आहे. प्रतिक असं या व्यक्तिरेखेचं नाव असून तो मुक्ताला पाहण्यासाठी आला आहे. एवढंच काय त्याने मुक्ताशी लग्न करायला होकार देखील दिला आहे. पण आता खरंच तो मुक्ताबरोबर लग्न करणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. अशातच मुक्ता अर्थात तेजश्री प्रधानची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने सागर म्हणजे अभिनेता राज हंचनाळेचा प्रश्न विचारला असून त्याने तेजश्रीला मजेशीर उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: “आता तो गळफास…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पुन्हा ट्रोल, नवा प्रोमो पाहून वैतागले प्रेक्षक

अभिनेत्री तेजश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तेजश्रीच्या मागे नमीता बांदेकर या दिसत असून तिनं लिहीलं आहे की, “चॅनेल माझ्या पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी आहे का?” असं लिहून तेजश्रीने राज हंचनाळेला ही स्टोरी टॅग केली आहे. याच स्टोरीला मजेशीर उत्तर देत राज म्हणाला की, “आगे बढनेवाले पिछे नही देखा करते.”

हेही वाचा- Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेला झाला मोठा आनंद, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या आठवड्याचा ऑनलाइन टीआरपी समोर आलेला आहे. यामध्ये ‘ठरलं तर मग’ पहिल्या स्थानावर असून ‘प्रेमाची गोष्ट’ दुसऱ्या स्थानावर आहे. या ऑनलाइन टीआरपीच्या यादीत पहिल्या पाच स्थानावर स्टार प्रवाहच्या मालिका आहेत.