‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या मुक्ता-सागरच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. या दोघांच्या लग्नात सावनी काही गौप्यस्फोट करणार असल्याचं प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल. सावनी या खलनायिकेचं पात्र मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारलं आहे. सावनी आणि सागरच्या कोळी कुटुंबाचे ऑनस्क्रीन नेहमीच खटके उडत असतात. परंतु, यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग नेमकं कसं आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अपूर्वाने मालिकेच्या सेटवरील पडद्यामागचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मालिकेत ऑनस्क्रीन सावनी आणि कोळी कुटुंबात सतत वाद होत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळतं. परंतु, त्यांचं खऱ्या आयुष्यात खूपच छान बॉण्डिंग असल्याचं अपूर्वाने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सावनीने सागर-मुक्ताच्या लग्नात ऑफस्क्रीन जबरदस्त डान्स केला आहे.

हेही वाचा : लगीनघाई! गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडुलकरने दिली प्रेमाची कबुली; फोटो शेअर करत म्हणाली, “सिक्रेट सांता…”

पडद्यावर एकमेकांशी भांडणारे सावनी आणि कोळी कुटुंबीय ऑफस्क्रीन तुफान धमाल करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत अपूर्वा लिहिते, “लग्न कोणाचंही असो…मी नाचायला कायम तयार असते. पडद्यामागचे धमाल व्हिडीओ पाहा. याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे.”

हेही वाचा : गौतमी देशपांडेचं लग्न ठरलं, होणारा नवरदेव कोण? मृण्मयीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरने शेअर केलेल्या या पडद्यामागच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच टीमच्या बॉण्डिंगचं भरभरून कौतुक करण्यात आलं आहे. याशिवाय मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागरचा विवाहसोहळा पार पडल्यावर सावनीला भविष्यात सईची कस्टडी मिळवण्यात प्रचंड अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता तिचा पुढचा डाव काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.