अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी तिने आदिल खान दुर्रानीशी लग्न केले. तर लग्नानंतर तिने धर्मांतरही केले. लग्नानंतर काही महिन्यांतच राखी आणि आदिलमध्ये वाद निर्माण झाले. आदिलचे दुसऱ्या मुलीशी अफेअर आहे हे राखीला समजल्यावर तिने त्याच्यावर मारहाण केल्याचे, फसवणूक केल्याचे आरोप केले. राखीच्या या आरोपांनंतर आता आदिल खान तुरुंगात आहे. अशातच तो तुरुंगातून राखीला मारून टाकण्याचा कट रचत आहे, असा दावा राखीने केला आहे.

राखीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती शत्रूंपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुआ पाठ करत असल्याचे सांगत आहे. ती म्हणाली, “मी शत्रूपासून दूर राहण्यासाठी दुवा म्हणत आहे. माझा जीव वाचवण्यासाठी मी हे करत आहे, कारण माझा जीव धोक्यात आहे. तुरुंगात आदिल मला मारण्याचा कट रचत असल्याचे मला नुकतेच समजले आहे. त्यामुळे कुराणातील हा श्लोक मी वाचत आहे.”

आणखी वाचा : “नमाज पठण करताना ‘असे’ कपडे…” नव्या व्हिडीओमुळे राखी सावंतवर नेटकरी नाराज

यानंतर तिने एक श्लोक वाचला. श्लोक वाचून झाल्यावर ती म्हणाली, “मी ही दुवा वाचली आहे. आदिल… ज्याचे अल्लाह रक्षण करतो त्याला तुम्ही मारू शकत नाही. माझा विश्वास आहे की, तू मला मारू शकत नाहीस. अल्लाह माझा रक्षणकर्ता आहे. मारेकऱ्यापेक्षा मोठा. मी दुवा वाचली आहे. माझी प्रार्थना मान्य होवो.”

‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार, राखी सावंतने एक कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंगही शेअर केले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये तिचा हितचिंतक आदिलच्या प्लॅन्सबद्दल तिला अपडेट देत आहे. त्यात तो म्हणतो, “मला नुकतेच जे समजले ते मला तुला सांगायचे आहे. मला माझी ओळख लपवायची आहे आणि मी तुमचा हितचिंतक आहे. आदिलच्या खोलीत काही लोक आहेत, त्याने तुला मारण्यासाठी काही लोकांशी करार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो हे प्लॅनिंग करत होता. तो सर्व पोलिसांना विकत घ्यायलाही तयार होता.”

यानंतर राखी म्हणते, “मी त्याला माफ केले आहे, मी रमजान महिन्यात रोजाही पाळला होता. त्याने माझ्या आईला मारले, त्याने मला फसवले तरीही मी त्याला माफ केले आहे. तुला खात्री आहे का तो मला मारण्याचा कट रचत आहे?” यावर तो माणूस म्हणतो, “मी खात्रीने सांगू शकतो की, तो तुला मारण्याच्या विचारात आहे. मी तुला शब्द देतो, मी तुझा साक्षीदार होऊ शकतो. त्याला या महिन्यात जामीन मिळणार आहे असेही मला समजले आहे. कृपया माझ्या नावाने तक्रार दाखल करू नकोस.”

हेही वाचा : “सर्व धर्मांची थट्टा…”; राखी सावंतकडून मोडला गेला रोजा, कारण ऐकताच संतापले नेटकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर राखीने त्या व्यक्तीला विचारले, “त्याने मला मारण्याची सुपारी कोणाला दिली आहे?” यावर ती व्यक्ती म्हणाली, “एका माणसाला आणि त्याने मला आदिलच्या प्लॅनबद्दल सांगायला सांगितले. कृपया सुरक्षित राहा. तू माझ्या बहिणीसारखी आहेस.” राखी सावंतने केलेले हे विधान ऐकून आता सर्वांनाच धक्का बसला आहे.