अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचं उघड केल्यानंतर राखीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आता रोज या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत.

आदिल खानची गर्लफ्रेंड तनु चंडेल गरोदर असल्याचं वृत्त समोर आलं होत. राखीने यावर भाष्य केलं आहे. राखीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. “आदिलची गर्लफ्रेंड तनु गरोदर असल्याची बातमी समजल्यावर मला धक्का बसला आहे. आदिलने माझ्याबरोबर बाळाचं प्लनिंग करुन गर्लफ्रेंडला प्रेग्नंट केलं”, असं राखी म्हणाली.

हेही वाचा>> रिसेप्शन सोहळ्यात सिद्धार्थ-कियाराचा कुटुंबियांसह भन्नाट डान्स, हॉटेलमधील Inside Video व्हायरल

हेही वाचा>> Bigg Boss 16: दीड कोटींची चेन, ८० हजारांचे बूट अन्…; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनची एकूण संपत्ती माहीत आहे का?

राखीने आदिलवर असलेल्या बलात्काराच्या आरोपाचा उल्लेखही व्हिडीओत केला आहे. “आदिलवर अनेक गुन्हे दाखल आहेत. कित्येक मुलींना त्याने फसवलं आहे. इराणी महिलेनेही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे”, असंही राखी म्हणाली आहे. राखीचा हा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; पण रिसेप्शन लूकमुळे सिद्धार्थ-कियारा ट्रोल, नेटकरी म्हणाले “नवविवाहित जोडपं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीने पती आदिलवर फसवणुक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. राखीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवाराली अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.