आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने लग्नाबाबत विधान केले आहे. तिने दोन लग्नं केलीत आणि दोन्ही लग्न टिकवण्यात तिला अपयश आलं. याच दरम्यान राखीने पुन्हा लग्न करण्याबाबत भाष्य केलं आहे. खरं तर राखीचा आदिलपासून अद्याप घटस्फोट झालेला नाही. त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टाने तिचा व आदिलचा घटस्फोट लवकरात लवकर मंजूर करावा अशी विनंतीही तिने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राखी सावंतने तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानपासून कोर्टाने पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच तिला लवकरच घटस्फोट घ्यायचा आहे, असंही तिने नमूद केलं. जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत लग्न करतच राहणार असल्याचं राखी म्हणाली आहे. “मला कोर्टाने आदिलपासून लवकर माझे पैसे मिळवून द्यावे आणि कोर्टाने आमचा घटस्फोट मंजूर करावा. जेणेकरून मी भविष्यात एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करू शकेन. मला योग्य जोडीदार मिळेपर्यंत मी लग्न करत राहीन, अशी घोषणा मी आज करत आहे,” असं राखी म्हणाली.

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

ती पुढे म्हणाली, “मी आयुष्यभर प्रेम करत राहीन कारण हेच माझे आयुष्य आहे. मी मेल्यानंतर दुसरे आयुष्य मिळणार नाही. हॉलीवूडमध्ये जाऊन बघा तिथे १०-१० लग्नं झाली आहेत. कित्येक अभिनेत्रींचे अनेक बॉयफ्रेंड्स आहेत, त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्या नात्यांना कोणीही नावं ठेवत नाही. लग्नाबाबतच्या सगळ्या लक्ष्मणरेषा या भारतात आहेत.”

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

दरम्यान, राखी सावंतने मे २०२२ मध्ये आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या लग्नाची सार्वजानिकरित्या घोषणा केली होती. पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आदिल व राखीची भांडणं झाली. आदिलने मारहाण केल्याचे व फसवणूक केल्याचे आरोप राखीने केले होते. त्यानंतर आदिलला अटक झाली होती आणि तो काही महिने पोलीस कोठडीत होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने राखीचे आरोप फेटाळले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant says she will keep getting married talks about ex adil khan durrani hrc
First published on: 29-12-2023 at 15:17 IST