आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूड आणि टीव्हीच्या दुनियेत स्वतःचे नाव कमावणारा अभिनेता रोनित रॉय सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्याने त्याची पत्नी नीलम बोस रॉयशी पुन्हा लग्नगाठ बांधली. रोनितने लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त पत्नीशी पुन्हा लग्न केलं. त्याने आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोनित रॉयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते लग्नाच्या विधी पूर्ण करताना दिसत आहेत. गोव्यातील एका शिवमंदिरात दोघांचा विवाह झाला. लग्नादरम्यान त्याची पत्नी नीलमने लाल साडी नेसली होती आणि दागिने घातले होते. तर अभिनेता पांढरा आणि लाल कुर्ता-पायजमा घातला होता.

५६ वर्षीय अरबाज खानने केलं दुसरं लग्न, शुरा खानशी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाला…

रोनित आणि नीलमचा १६ वर्षांचा मुलगा अगस्त्य बोस देखील त्याच्या पालकांच्या लग्नात उपस्थित होता. त्यानेही आपल्या पालकांचं दुसरं लग्न एंजॉय केलं. रोनित आणि नीलम व्हिडीओमध्ये हवन करताना दिसतात. तसेच एकमेकांना हार घालतात. त्यांनी एकमेकांना लग्नाचे सात वचन पुन्हा दिले.

रोनितने पहिलं लग्न मोडल्यावर नीलमशी केलेलं दुसरं लग्न

रोनित रॉयने अभिनेत्री आणि मॉडेल नीलम सिंहशी २००३ मध्ये दुसरं लग्न केलं होतं. नीलमला साडेतीन वर्षे डेट केल्यानंतर अभिनेत्याने लग्न केले. त्यापूर्वी रोनितचे लग्न जोहाना नावाच्या महिलेशी झालं होतं आणि या लग्नापासून त्याला एक मुलगी देखील आहे. तर नीलमपासून रोनितला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

रोनितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली. इतकंच नाही तर त्याने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त रोनित रॉयचा स्वतःचा व्यवसायही आहे. त्याची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ronit roy married second time to wife neelam bose roy videos viral hrc
First published on: 26-12-2023 at 12:50 IST