प्रसिद्ध अभिनेत्री सौम्या टंडन टीव्ही शो ‘भाबीजी घर पर है’ मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. सौम्याने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर रिअॅलिटी शो ‘जोर का झटका: टोटल वाइपआउट’ होस्ट केला होता. हा शो तिच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप शो असल्याचं तिने म्हटलंय. पण सौम्याला किंग खानसोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे.

सौम्या ‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “जेव्हा मला कळले की मी शाहरुखबरोबर शो होस्ट करतेय, तेव्हा मला वाटलं की हा माझ्या आयुष्यातील मोठा शो असेल, पण तो शो चालला नाही. तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. शाहरुख खानबरोबर मीटिंग आणि काम करताना मला खूप आनंद झाला. ते अत्यंत हुशार आहेत. ते केवळ एक उत्तम अभिनेते नाहीत, तर खूप हुशारही आहेत. हा शो करण्याआधी मी त्यांची कट्टर चाहती नव्हते पण जेव्हा मी त्यांना भेटले त्यानंतर मी त्यांची फॅन झाले.”

प्रसिद्ध अभिनेत्याचे २०२३ मधील दोन वादग्रस्त बॉलीवूड सिनेमे, एक ठरला सुपरफ्लॉप, तर दुसऱ्याने कमावले ९१५ कोटी

सौम्या पुढे म्हणाली, “मला आठवतं की मी त्यांच्याबरोबर शोचा लाँच इव्हेंट होस्ट करण्यासाठी पोहोचले होते. मी आल्यावर ते उभे राहिले. खरं तर त्यांनी हे करायची गरज नव्हती, कारण ते खूप मोठे स्टार आहेत. सर्व सीईओ आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी थांबल्या होत्या पण ते म्हणाले, ‘ही माझी तिच्याबरोबरची वेळ आहे.’ त्यामुळे त्यांची आणि माझी रिहर्सल संपेपर्यंत सगळे उभे होते. आम्ही जवळपास तासभर रिहर्सल केली. जेव्हा ते माझ्याबरोबर होते तेव्हा ते फक्त माझ्याबरोबर होते. त्यांनी माझ्या डोळ्यांत पाहून, मला आदर, वेळ आणि महत्त्व आणि जागा दिली. मला असं वाटलं नाही की मी एक नवीन व्यक्ती आहे. इतर सहकलाकारांप्रमाणेच मला आणखी रिहर्सल करायची आहे का, असं त्यांनी मला दोन-तीन वेळा विचारलं. ते तुमच्याबरोबर काम करताना पूर्ण लक्ष देतात आणि यामुळे ते सर्वात रोमँटिक हिरो आहेत, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देता तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे आहात आणि माझ्यासाठी तोच रोमान्स आहे.”

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘झोर का झटका: टोटल वाइपआउट’ हा एक भारतीय रिअॅलिटी गेम शो होता जो २०११ मध्ये इमॅजिन टीव्हीवर प्रसारित झाला होता. हा शाहरुख खान व सौम्या टंडनने होस्ट केला होता. यात करिश्मा तन्ना, डिम्पी गांगुली, आकाशदीप सैगल, मोहित सहगल, देबिना बॅनर्जी, कुशल पंजाबी, करण वाही आणि दिव्यांका त्रिपाठी हे कलाकार सहभागी झाले होते.