‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. मालिकेची दुपारची वेळ असली तरी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुळे, सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेल्या या मालिकेचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘मीठा खट्टा प्यार हमारा’, असं हिंदीतल्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शशांक केतकरने या मालिका प्रोमो शेअर करत ‘मीठा खट्टा प्यार हमारा’मधील कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानने निवेदिता सराफ यांच्या पायलट भाचीबरोबर घालवला वेळ, व्हिडीओ व्हायरल

शशांक केतकरने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘मीठा खट्टा प्यार हमारा’ प्रोमो शेअर करत लिहिलं आहे, “व्वा आमच्या मालिकेचा रिमेक आता हिंदीत, उत्कृष्ट कलाकारांसह…खूप भारी वाटतंय. अभिनंदन.”

हेही वाचा- रिंकू राजगुरुने कुटुंबासह पाहिलं ‘नियम व अटी लागू’ नाटक, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “वचवच, माज, नखरे काही नाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शशांकची ‘मुरांबा’ ही मालिका १४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. शशांकने साकारलेला अक्षय असो किंवा शिवानीने साकारलेली रमा असो प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अभिनेता आशय कुलकर्णींची एन्ट्री झाली.